करदात्यांची काळजी आणि विकसित भारताचा संकल्प, चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत

विशेष प्रतिनिधी

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प भारताच्या विकासाचा जणू रोडमॅपच आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतला विकसित भारत साकार करण्यासाठी या अर्थसंकल्पात काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. त्या दृष्टीने नियोजनबद्ध शहरीकरणावर भर देण्यात येईल. उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचं काम हा अर्थसंकल्प करेल. तसंच गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी अनेक ठोस उपाय या अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडले आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. Chandrakant Patil, Medha Kulkarni

अर्थसंकल्पावर बोलताना पाटील म्हणाले, पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे.

शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचनासारख्या महत्त्वाच्या विभागांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजना यशस्वी ठरल्याने महिलांसाठी आणखी महत्त्वाच्या योजनांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी निर्माण होणार आहेत.

शिक्षण आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींचं देशातलं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात उच्चशिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना अत्यंत स्तुत्य आहे असे सांगून पाटील म्हणाले,



⁠उच्च शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीअंतर्गत नवे संस्थान, विद्यापीठ टाउनशिप आणि टेलिस्कोप इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांसारख्या मूलभूत सोयी उभारण्याच्या दिशेने अनेक पावले उचलण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात प्रगत चिकित्सा व्यवस्था उभारण्याचा मैलाचा दगड ठरू शकेल असा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरद्वारे जीडीपीमध्ये वाढीसाठी संजीवनी मिळाली आहे. प्रत्येक ग्रोथ हबसाठी दर पाच वर्षांत 5000 कोटी देणारी तरतूद महत्त्वाची आहे. या तरतुदीचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर तसेच नागपूरसह देशातील अनेक महानगरांच्या ग्रोथहबसाठी निश्चितच होणार आहे.

एकुणात देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने पुढे जाईल, हे सुनिश्चित करणारा हा अर्थसंकल्प आहे, असचं म्हणता येईल.

कॅपेक्स स्पेंडिंग मध्ये वाढ असलेला, फिस्कल डेफिसिएट कमी करणारा व कर्जाचे जीडीपी बरोबरचे गुणोत्तर अधिक सक्षम करणारा असा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

भारतातील उत्पादन वाढवून, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुधारणा करणारा, त्यामुळे रोजगार निर्मिती वाढवणारा, युवकांची क्षमता वाढवून त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा, शहरे व गावे यांचा विकास करणारा, शेती, मच्छोत्पादन दुग्ध व्यवसाय व अनुषंगिक उत्पादने यांना प्रोत्साहन देणारा, महिलांचा विकास व सुरक्षितता देणारा अर्थसंकल्प आहे. संरक्षण खात्याशी संबंधित सामुग्रीची निर्मिती , नद्यांमधील वाहतूक, रेअर अर्थ मटेरियल कॉरिडॉर, सेमीकंडक्टर्स, सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स, बायोफार्मा, डाटा सेंटर हब अशी काही वैशिष्ट्ये यावर्षीच्या अर्थसंकल्पाची आहेत, असे त्यांनी सांगितले.

Taxpayer-Friendly Vision and Developed India Goal: Chandrakant Patil, Medha Kulkarni Welcome Budge

महत्वाच्या बातम्या