विशेष प्रतिनिधी
मुंबई : round of 11th admission राज्यभरात सुरू असलेली अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून अद्यापही सुरूच आहे. अंतिम विशेष फेरीनंतर शिक्षण संचालनालयामार्फत पुन्हा विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.यात उद्या, शनिवारपर्यंत (दि. १३) ही प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे.
यंदापासून राज्याच्या शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया २६ मेपासून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जूनमध्ये पहिल्या फेरीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. गेल्या चार महिन्यात चार नियमित फेऱ्या व तीन विशेष फेऱ्या, अशा एकूण सात फेऱ्यांच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली.
१० सप्टेंबरला प्रवेशाची अंतिम फेरी झाल्यानंतरही, ११ सप्टेंबरपासून शिक्षण संचालनालयामार्फत पुन्हा अजून एक प्रवेश फेरी सुरू करण्यात आली आहे. या फेरीअंतर्गत उद्या, शनिवारअखेर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी देण्यात आली आहे. प्रवेशाच्या पहिल्या दोन नियमित फेऱ्या वगळता, अकरावी प्रवेशाला विद्यार्थ्यांमधून अल्प प्रतिसाद मिळत होता. राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जाग रिक्त राहत असल्यामुळे, शिक्षण संचालनालयामार्फत जवळपास चार महिने झाले तरी ही प्रवेशप्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे
विभागात २५ टक्क्यांवर जागा रिक्त round of 11th admission
नाशिक विभागात अकरावी प्रवेशाच्या एकूण २ लाख १ हजार ४६० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी १ लाख ५० हजार ५६६ जागांवरील प्रवेश निश्चित करण्यात आले असून, एकूण प्रवेश क्षमतेच्या ७४.७३ टक्के जागांवरील प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्याप २५.२६ टक्के जागा रिक्त असून, या विशेष फेरीच्या माध्यमातून त्या जागा भरण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
तुकड्यांमध्ये शेवटपर्यंत वाढ round of 11th admission
वाढीव तुकड्यांसाठी विभागातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज केला असून, त्यांना मान्यता देण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. त्यामुळे जागांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले. प्रत्येक आठवड्याला तीन ते चार तुकड्या वाढत असल्याची माहिती या कार्यालयामार्फत देण्यात आली.
Special round of 11th admission, admission process not completed even after four months
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा