विशेष प्रतिनिधी
संगमनेर: Balasaheb Thorat माझ्या राजकीय प्रवासात असा गोंधळलेला आणि दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग मी कधीच पाहिला नाही, असा संताप माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.Balasaheb Thorat
अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवड प्रक्रिया मतदानाच्या केवळ एक दिवस आधीच पुढे ढकलण्यात आल्या, त्यामुळे उमेदवार आणि मतदारांमध्ये संभ्रम वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे बोलताना थोरात म्हणाले,Balasaheb Thorat
पूर्वीचे निवडणूक आयोग स्वायत्तपणे काम करायचे, परंतु आता आयोग सरकारच्या दिशेनुसार निर्णय घेत असल्याचे चित्र आहे. निवडणुका एक दिवस आधी पुढे ढकलणे, काही ठिकाणी प्रक्रिया थांबवणे, तर काही ठिकाणी जुन्या याद्यांवरून मतदानाची तयारी ठेवणे, या कृतींमुळे लोकांचा आयोगावरचा विश्वास ढासळत आहे.Balasaheb Thorat
न्यायालयाने आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुकांबाबत निर्णय घेऊ नये, असे आदेश पूर्वी दिले होते. तरीही कार्यक्रम आखताना सर्व घटकांचा विचार न केल्याने हा गोंधळ निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालय सांगते एक आणि आयोग करतो एक. मग प्रश्न पडतो, नेमकं राज्यात लोकशाही चालते की सत्तेची मनधरणी? निवडणूक कार्यक्रम तीन-तीन वेळा बदलला जात असल्याने उमेदवारांचे नियोजन बिघडत आहे आणि मतदारही गोंधळात पडले आहेत. हे सर्व लोकशाहीच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले.
निवडणूक आयोग स्वतः निर्णय घेणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतील तसे वेळापत्रक जाहीर करणार? प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्याच्या इशाऱ्यावर कार्यक्रम बदलला जाणार असेल तर आयोगाचे अस्तित्वच शंकेखाली येते, असा प्रश्न थोरातांनी केला.
लोकांनी उमेदवारांवर विश्र्वास ठेवून त्यांना साथ दिली. प्रचारात सर्व शक्ती खर्च केल्या, पण मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक रद्द केली, तर उमेदवारांचे आणि मतदारांचे काय? जनतेचे मत व्यक्त करण्याचा अधिकार हिरावणे म्हणजे लोकशाहीला धक्का आहे. चुकीची वेळापत्रक आखून नंतर चुका जनतेच्या माथी मारणे हे अत्यंत गैरकृत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी थोरात यांनी केली.
सत्ताधारी पक्षांना हव्या त्या पद्धतीने निवडणुका व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. ज्या नगरपरिषदांमध्ये विरोधक बलवान आहेत, तिथे कार्यक्रम पुढे ढकलला जातो, तर जिथे सत्ता मिळण्याची शक्यता आहे, तिथे मतदान वेळेत होते, असा आरोप करत थोरात म्हणाले, निवडणूक म्हणजे जनतेचा उत्सव. पण हे लोक या उत्सवाला संशय आणि अस्थिरतेची किनार लावत आहेत. ज्यामुळे सगळ्या लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणूक आयोगाने राजकीय दबाव झुगारून न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका घ्याव्यात, आणि जनता-लोकशाहीवरील विश्वास परत मिळवावा, अशी मागणी त्यांनी केली.
I have never seen an Election Commission that is confused and working under pressure, says Balasaheb Thorat
महत्वाच्या बातम्या
- Lt Gen Manjinder Singh : लेफ्टनंट जनरल म्हणाले- पाकने 90 तासांत गुडघे टेकले, ऑपरेशन सिंदूरमध्ये दीर्घ लढाईची तयारी होती
- Adani : अदानींनी 5 वर्षांपूर्वीचा कायदेशीर खटला संपवला; कोळसा खाण प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या कार्यकर्त्याशी समझोता
- पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कंबर कसून उतरल्या का नाहीत??
- भय्याजींच्या दूरदृष्टीतून ईशान्य भारतात ईश्वरी कार्य ऊभे; भैय्याजी जोशींचे गौरवोद्गार; भैय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता