विशेष प्रतिनिधी
पुणे; Rohit Pawar निवडणूक आयोगाने मतदानाचा फार्स करण्यापेक्षा थेट बोली लावून भाजपच्या उमेदवारांना विजयी घोषित करावे, जेणेकरून सरकारी तिजोरीतील पैसा तरी वाचेल,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मारला.Rohit Pawar
राज्यातील 23 नगरपालिका आणि 76 नगरपंचायतींच्या १५४ जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीकडून पैशांचा वापर आणि मतदारांची पळवापळवी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. “Rohit Pawar
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, भाजपवर शेकडो मतदारांना कोंडून लोकशाहीचा जाहीर लिलाव मांडल्याची टीका केली.अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे सेनेने 200 बोगस मतदार आणल्याचा भाजपाचा आरोप आहे… इथंच भाजपाच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटताना अजितदादांच्या राष्ट्रवादीने दोघांना पकडून भरारी पथकाच्या ताब्यात दिले आणि नांदेडच्या धर्माबादमध्ये पैशाचे अमिष दाखवून भाजपने शेकडो मतदारांना कोंडून ठेवत लोकशाहीचा जाहीर लिलाव मांडला, असा आरोप रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय.
लोकशाहीचे असे वस्त्रहरण होत असताना कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता मिळवून देण्याच्या मोहात अडकलेला निवडणूक आयोग मात्र ध्रुतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून शांत बसलाय. हे असेच चालायचे असेल तर निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचा फार्स न करता थेट बोली लावूनच भाजपच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावे आणि त्यांच्या विजयाच्या जल्लोषात सहभागी होऊन गुलाल अंगावर घ्यायलाही हरकत नाही.! यामुळे किमान निवडणुकीसाठी खर्च होणारा सरकारी तिजोरीतील पैसा तरी वाचेल, असा टोला रोहित पवार यांनी राज्य निवडणूक आयोगाला लगावला.
Instead of making a farce of voting, make a direct bid, Rohit Pawar challenges the Election Commission
महत्वाच्या बातम्या
- Sonia Gandhi : मनरेगावर मोदी सरकारचा बुलडोजर, सोनिया गांधी यांची टीका
- धर्माबाद शहरात तणाव, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप
- पुण्यात भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह ठाकरे गटाला धक्का; अनेक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश
- Vijay Vadettiwar : विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली, निवडणूक आयोगाला म्हणाले नालायक