विशेष प्रतिनिधी
श्रीरामपूर : MVA Wins श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत पुन्हा एकदा सत्तेचा गड राखला आहे. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांनी दणदणीत विजय मिळवत शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अनुराधा आदिक यांचा पराभव झाला.MVA Wins
नगरसेवक पदाच्या पक्षनिहाय आकडेवारीमध्ये काँग्रेसने-महा आघाडीने सर्वाधिक २० जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. भारतीय जनता पक्षानेही आपली उपस्थिती प्रभावीपणे नोंदवत १० जागांवर विजय मिळवला, तर शिंदेंच्या शिवसेनेला ३ जागा आणि एका अपक्ष उमेदवाराला विजय मिळाला आहे. करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मिळवलेल्या या मोठ्या यशामुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने झुकली असून, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत हा ऐतिहासिक विजय साजरा केला आहे.MVA Wins
राहुरी नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील तनपुरे गटाने (विकास आघाडी) आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत तनपुरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान पटकावला आहे.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही तनपुरे गटाने विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. एकूण जागांपैकी तब्बल १७ जागांवर तनपुरे गटाचे उमेदवार विजयी झाले असून, नगरपरिषदेवर विकास आघाडीची एकहाती सत्ता आली आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसून त्यांना केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता नगरपरिषदेवरील आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आज जाहीर झालेल्या निकालात भाजप-शिवसेना युतीने २० पैकी तब्बल १९ जागा जिंकून विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे स्वाधीन गाडेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान पटकावला आहे.
शहर विकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या आघाडीचे उमेदवार शशिकांत लोळगे हे एकमेव उमेदवार विजय मिळवू शकले.
MVA Wins in Shrirampur and Rahuri, Vikhe Patil Dominates Rahata Nagar Parishad
महत्वाच्या बातम्या
- Sonia Gandhi : मनरेगावर मोदी सरकारचा बुलडोजर, सोनिया गांधी यांची टीका
- धर्माबाद शहरात तणाव, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप
- पुण्यात भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह ठाकरे गटाला धक्का; अनेक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश
- Vijay Vadettiwar : विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली, निवडणूक आयोगाला म्हणाले नालायक