नवले पूल परिसरात पुन्हा अपघात! बस आणि कंटेनरची धडक; चार जण किरकोळ जखमी

विशेष प्रतिनिधी

पुणे : नवले पूल परिसरात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नवले पूलाजवळ सकाळच्या सुमारास बसची कंटेनरला मागून धडक बसली. धडकेचा आवाज इतका जोरदार होता की परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, येथे तातडीने सुरक्षिततेचे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Another accident in Navale Pool area! Bus and container collide; Four people slightly injured

महत्वाच्या बातम्या