Raj Thackeray : काय चर्चा करायच्या करा, एकनाथ शिंदेंना पुन्हा भेटेन, राज ठाकरे यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray आज निवडणुका संपल्या आहेत. आता एकनाथ शिंदे सत्तेत आहेत. त्यांना काही सूचना करायच्या असतील, चांगल्या गोष्टी करवून घ्यायच्या असतील तर त्यांना भेटू नये का? असा सवाल करत मी त्यांना पुन्हा भेटेन. तुम्हाला काय चर्चा करायच्या त्या करा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे.



राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली हाेती. या भेटीवरून राजकीय चर्चा सुरू आहे. एका बाजुला शिवसेना ठाकरे गट व मनसे यांची युती असताना राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांचे कट्टर विराेधक एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ठाकरे गटही नाराज आहे.

या पार्श्वभूमीवर बाेलताना आपण मुंबईसह विविध शहरांतील समस्यांच्या मुद्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे स्पष्ट केले. मनसेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आपल्याकडे आता पूर्वीसारखे निकोप राजकारण राहिले नाही. आज कुणी कुणाला भेटल्यानंतर त्यात युत्या, आघाड्याचे राजकारण शोधले जाते. आता 3 वर्षांनंतर निवडणुका आहेत. आता तर तशी परिस्थितीही नाही. आता निवडणुका संपल्यात. आज शिंद) सत्तेत आहेत. आम्हाला त्यांना काही सजेशन द्यायचे असतील, चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील, तर त्यांना भेटू नये का?

प्रत्येक वेळी त्यात काहीतरी शोधलेच पाहिजे याची काहीच आवश्यकता नाही. उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन. आज मुंबई, पुणे, ठाणे आदी अनेक शहरांत अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर आम्हाला जे वाटते ते सांगणे गरजेचे नाही का? तुम्ही पत्रकार त्या दिवशी तिकडे असता तर तिथेच बोललो असतो, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

Whatever you want to discuss, I will meet Eknath Shinde again, Raj Thackeray clarified

महत्वाच्या बातम्या