विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Vijay Wadettiwar काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी आज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रासह इतर 6 राज्यांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीनिमित्त दिल्लीत दाखल झालेल्या विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांची माफी मागितली आहे.Vijay Wadettiwar
चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीपर्यंत झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. यानंतरचंद्रपूर महानगर पालिकेतील महापौर- उपमहापौर पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवा बद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांची माफी मागितली. यावर नंतर बोलू अस म्हणत वरिष्ठांनी या विषयावर बोलणं टाळल्याचं माहिती सूत्रांनी दिली.Vijay Wadettiwar
भारत अमेरिका ट्रेड डीलच्या विरोधात रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसच्या बैठक आज पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठकी झाली. राहुल गांधी यांच्यासह बैठकीला महाराष्ट्रासह इतर 6 राज्याच्या प्रमुख बैठकीला उपस्थित होते. बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , कॉंग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांच्यासह खासदार रजनी पाटील, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, सुखंजिदर सिंह रंधावा. मध्यप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू या नेत्यांच्या उपस्थित बैठक झाली.
Congress High Command Upset Over Chandrapur Row; Vijay Wadettiwar Seeks Senior Leadership Intervention
महत्वाच्या बातम्या
- सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट, आदित्य ठाकरे यांची टीका
- राज्यसभेत शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अटी
- शिवजयंतीनिमित्त महसूल विभागाची मोठी घोषणा; एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार
- रोहित पवार यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी