चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचंय : ओवेसी यांचे नवनीत राणा यांना प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी

अमरावती: तुम्ही चार नाही तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला काय करायचंय? असे प्रत्युत्तर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी माजी खासदार नवनीत राणा यांना अमरावतीत जाहीर सभेत दिले.

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा दाखला देत हिंदूंना आवाहन केले होते की, “जर ते १९ मुलं जन्माला घालत असतील, तर आपणही किमान ४ मुलं जन्माला घातली पाहिजेत. ” राणांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.



यावरून नवनीत राणांवर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, “मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, नवनीत राणा म्हणतात ४ मुलं जन्माला घाला. मी सांगतो तुम्ही ८ मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही. पण तुम्ही केवळ द्वेषाचे राजकारण करत आहात. अशा प्रकारच्या वक्तव्यांनी जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून भरकटवले जात आहे.

अजित पवारांवरही हल्लाबाेल करताना ओवेसी म्हणाले, “जे आपल्या काकांचे शरद पवार यांचे झाले नाहीत, ते तुमचे काय होणार? आता ‘घड्याळाची’ वेळ गेली असून ‘पतंग’ उडवण्याची वेळ आली आहे.
लोक मला म्हणतात मी भाजपची बी टीम आहे. पण मी कोणाची टीम नाही, मी तर अल्लाचा पुतळा आहे आणि लोकांसाठी काम करायला आलो आहे, असेही त्यांनी सांगितले.

Owaisi Hits Back At Navneet Rana

महत्वाच्या बातम्या