Chandrashekhar Bawankule : निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Chandrashekhar Bawankule निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.Chandrashekhar Bawankule

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यापूर्वी राज्यात बिनविरोध सरपंच निवडून यायचे, तेव्हा आम्ही कधीच विरोध केला नाही. जनतेला विकास हवा आहे, म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मागे उभे राहण्याचे ठरवले आहे.” राज ठाकरेंनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याची गरज नव्हती
राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनातून भाजपवर ‘दुटप्पी’ भूमिकेचा आरोप केला होता. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुकांना विरोध करणारा भाजप महाराष्ट्रात त्याचे समर्थन कसे करतो, असा सवाल त्यांनी विचारला होता. याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, “ज्याला जिथे जायचे आहे तिथे जाण्याचा अधिकार लोकशाहीत आहे. बिनविरोध निवडीमध्ये कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही. मग यात आक्षेप घेण्यासारखे काय?”.Chandrashekhar Bawankule



यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी होत नसेल, म्हणूनच ते आता मुंबईतील शिवसेना-मनसेच्या शाखांना भेटी देत फिरत आहेत,” असे ते म्हणाले.

सोलापूरच्या नेत्या प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. “प्रणिती शिंदे कधीही भाजप नेत्यांच्या भेटीला आलेल्या नाहीत आणि त्या आमच्या संपर्कातही नाहीत. अफवा पसरवून उगाच एखाद्याचे राजकीय करिअर कशाला उद्ध्वस्त करता?” असे म्हणत त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.

What’s Wrong With Unopposed Elections?” Asks Chandrashekhar Bawankule

महत्वाच्या बातम्या