विशेष प्रतिनिधी
पुणे :Aishwarya Pathare पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विमाननगर येथील संजय पार्क परिसरात आयोजित हळदी-कुंकू समारंभात ऐश्वर्या पठारे (Aishwarya Pathare) यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी परिसरातील महिला भगिनींशी संवाद साधत महिला सक्षमीकरण, सुरक्षितता आणि आत्मनिर्भरतेचा संदेश दिला.
संवादादरम्यान ऐश्वर्या पठारे(Aishwarya Pathare) म्हणाल्या की, जिजाऊ आईसाहेबांनी दिलेला संस्कारांचा वारसा, सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेली शिक्षणाची वाट आणि राजमाता अहिल्याबाई होळकरांनी घडवलेले आदर्श प्रशासन या सर्व विचारांनी समाज घडवला आहे. “स्त्री सक्षम झाली, की कुटुंब, समाज, प्रभाग तसेच राष्ट्र सक्षम होते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने यापूर्वी सखी प्रेरणा मंच आणि सुरेंद्र पठारे फाउंडेशन यांच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी विविध उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारतीय जनता पक्ष नेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे या क्षेत्राला नवा आयाम मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला भगिनी सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर व्हाव्यात, हाच माझ्यासह सहकारी उमेदवारांचा संकल्प असल्याचे सांगत, हा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी महिलांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात माझ्यासह सहकारी उमेदवार डॉ. श्रेयस प्रितम खांदवे, अनिल दिलीप सातव आणि रामदास दत्तात्रय दाभाडे यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन ऐश्वर्या पठारे यांनी केले.
Aishwarya Pathare Interacts With Women During Haldi-Kumkum Ceremony in Viman Nagar
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन