विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे केवळ पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Raj Thackeray
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असले तरी या युतीला आता कोणतेही राजकीय महत्त्व उरलेले नाही. जर 2009 सालीच शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते, तर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आज वेगळी असती. त्या काळात या युतीला मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा मिळाला असता. मात्र आता वेळ निघून गेली असून, दोन्ही नेत्यांकडे पूर्वीसारखी मतांची ताकद राहिलेली नाही.
राज ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव होणार आहे. या युतीचा फायदा उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो, मात्र राज ठाकरे यांना त्यातून काहीही मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या मतांचा आधार आता संपलेला असून, त्यांची भूमिका या युतीत दुय्यम ठरेल, असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे केवळ निवडणूक हरतील असे नाही, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाची नोंद त्यांच्या नावावर होईल, ही माझी ठाम भविष्यवाणी आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, पण विचारांचा वारसा मिळत नाही, अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारधारेशी संबंधित वारसा मिळालेला नाही, असा आरोप केला. या वक्तव्यामुळे ठाकरे गटात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे थेट वैचारिक वारशावर सवाल उपस्थित केल्याने राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
Raj Thackeray Will Be Remembered for the Biggest Defeat in History, Predicts CM Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन