विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले आहेत. वरळी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 193 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरिश वरळीकर यांनी महिलांना बैठकीच्या नावाखाली बोलावून थेट पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अपक्ष उमेदवारांसह शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी हे आरोप केले असून, यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात अशा प्रकारे पैसे वाटपाचे आरोप झाल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सूर्यकांत कोळी हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख आहेत. प्रभाग क्रमांक 193 मधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या सूर्यकांत कोळी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले आहेत. माजी शाखाप्रमुखाचाच पक्षातील उमेदवाराविरोधात थेट आरोप केल्याने शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातही चर्चा रंगली आहे. मात्र, या आरोपांवर शिवसेना ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. Aditya Thackeray
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 29 मध्ये रविवारी भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीन ते चार जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
Allegations of money distribution in Aditya Thackeray’s Worli assembly constituency
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन