विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange माझ्या नावाने कोणी पाठिंब्याचे पत्रक प्रसिद्ध करत असेल, तर त्यावर समाजाने विश्वास ठेवू नये असे सांगत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही राजकीय आघाडीला पाठिंबा दिला नसल्याचे जाहीर केले आहे.Manoj Jarange
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाविकास आघाडी किंवा महायुती यांपैकी कोणाचीही बाजू घेतलेली नाही, असे स्पष्ट करत त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा कुणालाही पाठिंबा नाही. माझे जूने व्हिडिओ कोणी व्हायरल करत असतील तर ते चूकीचे आहे. माझ्या नावाने कुणी पत्रके प्रसिद्ध करत असतील तर त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. जर कुणी स्थानिक पातळीवर पिठींबा दिला असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत विषय असेल त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणाला विरोध करणारे ते जर कोणी उभे असतील त्यांना मात्र मराठा समाजाने सहकार्य करू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते लोक मराठा समाजाच्या लेकरांच्या मुळावर उठलेले आहेत, ते लक्षात घ्यावे. मुंबईसह, महाराष्ट्रात कोणाला पाठिंबा दिलेला नाही, हे लक्षात घ्यावे. महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. मुंबई असो की महाराष्ट्रातील इतर महापालिका निवडणुकीत कोणाला पाठिंबा दिलेला नाही. चळवळीत असणाऱ्या पोरांवर सर्वांनी लक्ष ठेवले पाहिजे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
Manoj Jarange Makes It Clear, No Support To Any Political Alliance
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन