विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnvis महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) रवाना होणार आहे. हा दौरा १७ ते २४ जानेवारी दरम्यान असणार असून, तब्बल आठ दिवस महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येणार आहे.CM Fadnvis
या शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, वरिष्ठ सनदी अधिकारी, एमआयडीसी आणि उद्योग विभागाचे प्रतिनिधी तसेच गुंतवणूक प्रोत्साहनाशी संबंधित अधिकारी सहभागी होणार आहेत. यंदाच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रासाठी विक्रमी परकीय गुंतवणूक करार (MoUs) करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.CM Fadnvis
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन क्षेत्र, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर, ग्रीन एनर्जी, डेटा सेंटर्स, लॉजिस्टिक्स, फार्मा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यावर सरकारचा भर असणार आहे. विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, बँकिंग आणि वित्तीय संस्थांशी थेट बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे महाराष्ट्राची औद्योगिक, पायाभूत आणि धोरणात्मक ताकद मांडणार असून, “मेक इन महाराष्ट्र” आणि “महाराष्ट्र : भारताचा ग्रोथ इंजिन” या संकल्पनेवर भर देण्यात येणार आहे. राज्यातील नवीन औद्योगिक धोरण, गुंतवणूक सुलभता, सिंगल विंडो प्रणाली आणि जलद परवानगी प्रक्रियेचे सादरीकरणही या दौऱ्यात केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असून, राज्य सरकार विकास आणि गुंतवणूक यांना सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मागील वर्षीच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्राने हजारो कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले होते. यंदा त्या तुलनेत अधिक मोठ्या आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य करारांवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या दौऱ्याचा राज्यातील रोजगारनिर्मिती, औद्योगिक विस्तार आणि आर्थिक वाढीवर मोठा परिणाम होईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Day After Civic Poll Counting, CM To Leave For Davos Summit
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन