विशेष प्रतिनिधी
पुणे: Shantilal Suratwala पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.Shantilal Suratwala
शांतीलाल सुरतवाला यांचा राजकीय प्रवास १९७९ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झाला. सिटी पोस्ट वॉर्डातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. १९७९ ते २००७ या दीर्घ काळात त्यांनी नगरसेवक तसेच महापौर म्हणून पुणे शहराची सेवा केली.Shantilal Suratwala
शांतीलाल सुरतवाला हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. स्वतःहून कधीही पदाची अपेक्षा न करणारे सुरतवाला यांना शरद पवारांनी स्वतः महापौरपदाची जबाबदारी दिली होती. ते प्रसिद्ध आनंद ऋषीजी ब्लड बँकेचे संस्थापक होते. तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनही शहरात त्यांची वेगळी ओळख होती.
अभिनव कल्पना राबविणारे महापौर, आनंद ऋषीजी ब्लड बँकेचे संस्थापक आणि काँग्रेस-राष्ट्रवादी चळवळीतील निष्ठावंत नेता अशी शांतीलाल सुरतवाला यांची ओळख होती.
महापौर असताना त्यांनी पुण्याच्या विकासासाठी अनेक अभिनव योजना मांडल्या. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे शहरातील प्रमुख रस्ते धुण्याची. कात्रज तलावाच्या पाण्याचा वापर करून शहरातील १२ प्रमुख रस्ते धुणे, त्याआधी खड्डे बुजवणे आणि वाहतूक कोंडी कमी करणे, तसेच प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे, असा त्यांचा दूरदृष्टीपूर्ण विचार होता. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.
Former Pune Mayor Shantilal Suratwala Passes Away
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ