बिनविरोध निवडून आलेल्या मंजुषा नागपूरे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ , परशुराम वाडेकर उपमहापौर होणार

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे यांच्या गळ्यात पुण्याच्या महापौर पदाची माळ पडणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला उपमहापौर पदावर संधी मिळणार आहे. Manjusha Nagpure

ज्येष्ठतेच्या निकषावर वर्ष तापकीर यांना महापौर पद मिळावे यासाठी सभागृह नेते गणेश बिडकर आग्रही होते. परंतु खासदार मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि राजेश पांडे यांनी मात्र मंजुषा नागपूर यांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्ष श्रेष्टींकडून मंजुषा नागपुरे यांना प्रथम संधी देण्याचे निश्चित झाले आहे Manjusha Nagpure.



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सहा नगरसेवक सभागृहामध्ये असल्यामुळे परशुराम वाडेकर यांना उपमहापौर पदावर संधी मिळणार आहे. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आज परशुराम वाडेकर उपमहापौर पदाचा अर्ज भरणार आहेत.

दरम्यान भारतीय जनता पार्टीमध्ये महापौर पदासाठी जवळपास चार ते पाच नावे चर्चेत होती. वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रंजना टिळेकर किंवा एखादा नवीन नगरसेविकेला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. भाजपाला पुणे महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे सर्वच नगरसेवकांच्या आकांक्षा वाढल्या होत्या. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार बिनविरोध निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे यांना पहिली सव्वा वर्षी महापौर पदावर विराजमान होण्याची संधी प्राप्त झाली आहे. Manjusha Nagpure

Manjusha Nagpure Elected Unopposed as Pune Mayor; Parshuram Wadekar Set to Become Deputy Mayor