महापौरपदासाठी भाजपकडून मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित, राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेसचेही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडूण आलेल्या मंजूषा नागपुरे यांचे नाव महापौरपदासाठी भाजपकडून निश्चित करण्यात आले आहे. Manjusha Nagpure

मंजूषा नागपुरे यांची निवड भाजपाने केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज आज नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून महापौर पदासाठी कोणाताही उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार नसल्याची माहिती होती. परंतु दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. यासोबतच कॉंग्रेस पक्षाने देखील दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सभागृहात मतदान घेवून महापौर पदाची निवड केली जाणार आहे. Manjusha Nagpure

नागपुरे यांची महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेस पक्षाने दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवडणूक होणार आहे. ही सभा ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या तारखेपर्यंत तसेच सभागृहात देखील उमेदवारांना माघार घेता येते. त्यामुळे मतदान होणार की बिनविरोध निवडणुक होणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेवर भाजपचे ११९ नगसेवक निवडूण आले असल्याने भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नागपुरे यांचा विजय निश्चिच मानला जात आहे. त्यांच्या निवडीच्या घोषणा झाल्यानंतर सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार असून, स्थानिक पातळीवर आनंद व्यक्त केला जात आहे. सिंहगड रोड परिसरातून प्रथमच महापौरपद मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंजूषा नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या पुणे महालिकेच्या महापौरपदाची सूत्रे हाती घेतील.



मंजूषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजय मिळवला होता. महापालिकेतील त्यांचा अनुभव, पक्षातील कार्य आणि संघटनात्मक कामकाजाची जाण लक्षात घेता त्यांच्या नावावर एकमत झाले. मंजूषा नागपुरे या कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणी, भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केले आहे. महापौरपदासाठी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती. Manjusha Nagpure

दरम्यान, ही निवड बिनविरोध करायची किंवा कसे यांबाबत विरोधी पक्ष नेता कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रसचे आमदार चेतन पाटील तुपे, विरोधी पक्षनेते निलेश निकम आणि सुनील टिंगरे तसेच सुभाष जगताप यांची चर्चा सुरू होती. निकम आणि तुपे पाटील यांनी यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवरून बोलणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीने महापौर पदासाठी शीतल सांवत तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांचे नाव निश्चित केले. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कॉंग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे व उपमहापौर पदासाठी साहिल शिवाजी कादरी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज केला. याघडामोडींमुळे या पदांसाठी बिनविरोध होणारी निवडणुक आता मतदान प्रक्रियेनंतर पार पडणार आहे.

  • योगेश टिळेकर यांना आमदारकी दिल्याने त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांचा पत्ता कट करण्यात आला. तर मानसी देशपांडे या आमदार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजयी आहेत. त्यामुळे त्यांना पद देण्यात आले नसल्याची माहिती आहे. वर्षा तापकीर यांना सव्वा वर्षानंतर महापौर पद देण्याचे आश्वासन देण्यात येणार असल्याचे बोलले जा आहे. पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती. परंतु लगेच निवडणुक झालेली नाही. सभागृहात देखील माघार घेता येते. त्यामुळे मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात सुरु होण्यापूर्वी अनेक घडामोडी होतील. असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी सांगितले.

    मंजुषा दीपक नागपुरे यांचा परिचय
  • शिक्षण- एम. कॉम
  • राष्ट्रसेविका समिती – सेविका
  • २०१२ – पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य
  • २०१२ – पासून नगरसेविका
  • २०१७ – स्थायी समिती सदस्य
  • २०२६ – च्या निवडणुकीत बिनविरोध नगरसेविका
  • प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या
  • आयटी कंपनीत आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग   

BJP Finalises Manjusha Nagpure for Mayor’s Post; NCP and Congress Also Enter the Fray