विशेष प्रतिनिधी
पुणे: Sonali Andekar पुणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून अधिकृत उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने येत्या निवडणुकीकडे शहराचे लक्ष लागले आहे. भाजपाकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांनी, तर उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी शितल सावंत आणि उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे, तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांनी अर्ज दाखल केले आहेत.Sonali Andekar
अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर पदाची निवड 9 तारखेला होणार आहे. याच दिवशी पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा (जनरल बॉडी मीटिंग) सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सभेत महापौर व उपमहापौरांची औपचारिक निवड केली जाणार असून, उपस्थिती बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.Sonali Andekar
दरम्यान, या निवड प्रक्रियेसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या नगरसेविका सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनाही या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून संबंधित पक्षाला तसेच कारागृह प्रशासनाला पत्र पाठवण्यात येणार आहे. महापालिकेने या पत्राचा ड्राफ्ट तयार केला असून, ते पत्र कारागृहात जमा करून दोन्ही नगरसेविकांची 9 तारखेला होणाऱ्या सभेसाठी उपस्थिती दर्शवण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “महापौर निवडणुकीच्या दिवशी सर्व नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे तुरुंगात असलेल्या नगरसेविकांनाही नियमानुसार पत्र पाठवण्यात येणार आहे.”
एकूणच, 9 तारखेला होणारी पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा आणि महापौर-उपमहापौर निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, शहराच्या सत्ताकारणाचा पुढील दिशा याच दिवशी स्पष्ट होणार आहे.
Lakshmi and Sonali Andekar to be summoned from jail for Mayor–Deputy Mayor election!
महत्वाच्या बातम्या
- भाजपसाेबत जाणार नाही.. नाही म्हणजे नाही, राज ठाकरे यांनी केले वृत्ताचे खंडन
- Sharad Pawar :विलीनीकरणाच्या चर्चेत जे उपस्थित नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती, शरद पवार यांचा सवाल
- Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार; पुण्यातील पाच आरोपींनी दिली कबुली
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन