पुणे : Mumbai–Pune मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या 33 तासांपासून सुरू असलेल्या तीव्र वाहतूक कोंडीला अखेर दिलासा मिळाला आहे.Mumbai–Pune
आडोशी बोगद्याजवळ अपघातग्रस्त झालेला केमिकल टँकर यशस्वीरीत्या बाजूला काढल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली.Mumbai–Pune
या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल 31 तासांहून अधिक काळ पूर्णपणे ठप्प होती. हजारो वाहने महामार्गावर अडकून पडली होती. खासगी वाहने, अवजड ट्रक, मालवाहतूक तसेच अत्यावश्यक सेवांवर याचा मोठा परिणाम झाला.Mumbai–Pune
दिनांक 04/02/2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ केमिकल टँकरचा अपघात झाला होता. अपघातानंतर टँकरमधून वायू गळतीची शक्यता निर्माण झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या केमिकल एक्सपर्टनी वायू गळती रोखण्यासाठी किमान दोन तासांचा अतिरिक्त कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाला कळवले होते.
सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर, टँकरमधील धोकादायक रसायनांची गळती थांबवण्यात आली आणि त्यानंतर विशेष क्रेनच्या सहाय्याने टँकर महामार्गावरून बाहेर काढण्यात आला. या संपूर्ण कारवाईत वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, केमिकल तज्ज्ञ, महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन यांनी संयुक्तपणे काम केले.
सध्या पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन लेनवरून सुरू ठेवण्यात आली असून पुणे लेनवरील पहिल्या वाहिनीवरून मुंबईकडे येणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक हळूहळू सुरळीत होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, जुना मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH48) या काळात सुरू ठेवण्यात आला होता, त्यामुळे अनेक वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करता आला. प्रशासनाने वाहनचालकांना संयम बाळगण्याचे, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि अधिकृत सूचनांनुसारच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai–Pune Expressway Restored After 33 Hours as Authorities Clear Chemical Tanker Accident)
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक,