Varsha Gaikwad : आम्ही काय हत्यार घेऊन उभे होतो का मारायला? पंतप्रधानांवर हल्ल्याच्या आरोपावर वर्षा गायकवाड यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Varsha Gaikwad  आम्ही बॅनर घेऊन उभे होतो. आम्ही काय हत्यार घेऊन उभे होतो का मारायला? असा सवाल काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.Varsha Gaikwad

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संसदेत विरोधकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता जेव्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी सत्ताधारी नेत्यांच्या खुर्च्यांना घेराव घातला. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या खुर्चीचाही समावेश होता. महिला खासदारांच्या हातात मोठे बॅनर होते, ज्यावर लिहिले होते – जे योग्य आहे, ते करा. यावेळी मोदी त्यांच्या खुर्चीवर नव्हते. परंतु, या झालेल्या गोंधळामुळे अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले होते. गोंधळानंतर 8 विरोधी खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज पुन्हा गोंधळ झाला होता. परंतु, यावरून थेट पंतप्रधानांवर हल्ला करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.Varsha Gaikwad

वर्षा गायकवाड यांनी हो म्हटले. पुढे त्या म्हणाल्या, आम्ही जिथे कुठे बसलो आहोत, त्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे. लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा आम्ही वापर करू शकतो, संवैधानिक हत्याराचा आम्ही वापर करू शकतो.Varsha Gaikwad



भाजपच्या नेत्यांनी दावा केला की हातात काचेच्या बांगड्या होत्या, हत्यार म्हणून वापरण्यासाठी. त्यावर वर्षा गायकवाड म्हणाल्या, हातात बांगड्याच नाहीत, लग्नापासून घातल्या नाहीत. मला एक सांगा, ज्या महिला काचेच्या बांगड्या घालतात, त्यांचा मी सन्मान करते. महिला हातात बांगड्या घालतात, पण त्या बांगड्यांचा अर्थ असा होत नाही की ते मारण्यासाठी घालतात. ते त्यांचं सौभाग्याचे लेणं म्हणून घालतात.

आमचे म्हणणे एकच आहे की एक व्यक्ती सातत्याने उठणार आणि संसदेच्या पूर्ण प्रणालीला बाजूला ठेऊन पूर्णपणे वेगळे काहीतरी बोलणार, बेजबाबदार आणि अश्लील बोलणं असतं त्यांचं आणि अशा व्यक्तीचे पुस्तक चालते, त्याचे रेफरन्स चालते आणि विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजी जर त्या वेळेला बोलतात, चीनच्या घुसखोरीबद्दल तर ते तुम्हाला चालत नाही? आता आज त्यांनी कर नरेटीव्ह सेट केला की विरोधी महिला खासदार मारायला आल्या. खोटे बोला पण रेटून बोला याचे दुसरे नाव भाजप आहे, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

“Were We Standing With Weapons?” Varsha Gaikwad Questions Allegation of Attack on PM

महत्वाच्या बातम्या