Ramdas Kadam : अजितदादा गेल्यानंतर तटकरेंचे गलिच्छ राजकारण, महाराष्ट्र माफ करणार नाही: रामदास कदमांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी : Ramdas Kadam अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांतच सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच वहिनींना शपथ घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा करत, “दहा दिवस थांबले असते तर काय बिघडले असते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार ताबा घेतील या भीतीपोटीच हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप करत, ही कृती निंदनीय असून महाराष्ट्र तटकरे यांना कधीही माफ करणार नाही, असे कदम म्हणाले.Ramdas Kadam

जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.Ramdas Kadam



 

सुनील तटकरे हे विश्वासघातकी असल्याचा आरोप करत, ज्यांनी त्यांना मोठे केले त्यांनाच संपवण्याचे काम त्यांनी केल्याचे कदम यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत आपण तटकरे यांना निवडून आणले, मात्र योगेश कदम यांचा पराभव व्हावा यासाठी तटकऱ्यांनीच प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले , भास्कर जाधव यांचा तोल सुटला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा टोला लगावत, “भुंकणाऱ्याकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळ नाही. जाधव यांचा मेंदू सडलेला असून त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे.

गुहागर मतदारसंघात सर्वत्र पराभव दिसत असल्यामुळेच जाधव अशा प्रकारची भाषा वापरत असल्याचा दावा करत, १९९५ मध्ये जाधव यांना आमदारकीची संधी आपणच दिली होती आणि त्यांना शिवसेनेत आणले होते, असा दावाही कदम यांनी केला.

“Dirty Politics After Ajit Pawar’s Death, Maharashtra Will Not Forgive Him,” Ramdas Kadam Targets Tatkare

महत्वाच्या बातम्या