विशेष प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे रवी बाबासाहेब लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली. Ravi Landge
महापालिकेतील विशेष सभेत पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी अधिकृत घोषणा केली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही पक्षाकडून विरोधी अर्ज न आल्याने भाजपचे दोन्ही उमेदवार निर्विवादपणे विजयी ठरले.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पत्राद्वारे माहिती दिली होती. त्यानुसार सोमवारी (दि. २) उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी कोणताही उमेदवार देण्यात आला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाने पिंपरी-चिंचवड महापौर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येणे निश्चित झाले. भाेसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुन्हा एकदा पिंपरी – चिंचवड महापालिकेत वर्चस्व सिध्द केले आहे.
Ravi Landge as Pimpri-Chinchwad Mayor, Sharmila Babar as Deputy Mayor
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक