विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असली, तरी त्यांचा वारसा आणि पक्षसंघटना पुन्हा सक्षम करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढाकार घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच त्यांनी पुणे जिल्ह्यातील पक्षबांधणीला वेग दिला आहे. Jansamvad
अजित पवार यांच्या निधनानंतर शोकाकुल वातावरणात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला अनपेक्षितपणे मोठे यश मिळाले. जिल्हा परिषदेत ७३ पैकी तब्बल ५१ जागा जिंकत पक्षाने सत्ता कायम राखली. प्रचार न करताही मतदारांनी दिलेली सहानुभूती आणि विश्वास यामुळे राष्ट्रवादीची ताकद पुन्हा अधोरेखित झाली.
शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांनी संघटनात्मक कामकाजावर लक्ष केंद्रित केले आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव आणि मावळ येथील नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधत त्यांनी आगामी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसंदर्भातही मार्गदर्शन केले. दिवंगत अजित पवार यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
‘जनसंवाद’चा नवा अध्याय ?
अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेला ‘जनसंवाद’ उपक्रम पुण्यातूनच आरंभला होता. नागरिकांच्या थेट भेटीगाठी, अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचे तत्काळ निराकरण आणि पक्षाविषयी अभिप्राय जाणून घेण्याची ही शैली लोकप्रिय ठरली होती. १३ सप्टेंबर २०२५ रोजी हडपसर विधानसभा मतदारसंघातून सुरू झालेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला होता.
आता हाच संवाददौरा नव्या स्वरूपात पुन्हा सुरू करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. सुनेत्रा पवार स्वतः जनतेमध्ये जाऊन प्रश्न जाणून घेणार, स्थानिक पातळीवरील अडचणी सोडवणार आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणार, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे.
राजकीय वर्तुळातही याबाबत उत्सुकता आहे. हा ‘जनसंवाद’ दौरा राष्ट्रवादीला पुन्हा नवसंजीवनी देणार का? अजित पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेत सुनेत्रा पवार जनतेशी नाळ घट्ट जोडण्यात कितपत यशस्वी ठरणार?
एक मात्र निश्चित—पुणे जिल्ह्यातून सुरू होणारा हा संवादप्रवास राष्ट्रवादीसाठी केवळ कार्यक्रम न राहता नव्या उभारणीचा पाया ठरू शकतो. ‘राष्ट्रवादी पुन्हा’ उभी राहण्याची आशा आता कार्यकर्त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसू लागली आहे.
After Dada, now Sunetra Pawar ‘Jansamvad’; Will the NCP Rise Anew?
महत्वाच्या बातम्या
- व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल
- Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा
- “तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल
- संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया