Rahul Narwekar : त्या घटनेशी माझा काय संबंध? राहुल नार्वेकर यांचे संजय राऊत यांना उत्तर

विशेष प्रतिनिधी

मुंबई ,: Rahul Narwekar माझ्या शेतजमीनिवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर माझ्या कामानिमित्त पुढे निघून गेलो. सदर वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण माझे नाव त्या घटनेशी जोडू नये, ही नम्र विनंती, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केले आहे.Rahul Narwekar

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी एक महिला व व्यक्ती वाद घालताना दिसून येत आहेत. राहुल नार्वेकरांनी ही घटना कुठे व का घडली हे सांगावे अन्यथा मी ती सांगेन, असा इशाराही राऊत यांनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना दिला होता. आता यावर राहुल नार्वेकरांनी ट्विट करत या प्रकरणी खुलासा केलया आहे.Rahul Narwekar



संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, एक महिला आणि एक पुरुष काही कारणावरून राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालत आहेत. घटनास्थळी उपस्थित काहीजण या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर महिला नार्वेकरांसोबतच्या एका व्यक्तीला मारहाण करतानाही दिसून येत आहे. पण संजय राऊत यांनी दावा केला तसा नार्वेकरांशी धक्काबुक्की झाली आहे का? हे या व्हिडिओत दिसत नाही. हा व्हिडिओ जुना आहे की ताजा? हे ही अजून स्पष्ट झाले नाही.

राहुल नार्वेकरांनी ट्विट करत म्हटले की, आज सोशल मीडियावर माझ्याबाबत प्रसारित होत असलेल्या व्हिडिओ संदर्भात मी सत्य परिस्थिती स्पष्ट करू इच्छितो. मी परवा माझ्या शेतजमीनिवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर माझ्या कामानिमित्त पुढे निघून गेलो.

“What Is My Connection to That Incident?” Rahul Narwekar Hits Back at Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या