विशेष प्रतिनिधी
रायगड : काँग्रेसमध्य सर्व जण ही शिवरायांच्या विचारांच्या उलट वागणारी लोकं आहेत. या लोकांना जोड्याने मारण्याची गरज आहे. टिपू सुलतानचा जास्त पुळका आला असेल तर तुमच्या बायका पाेरांची नावे त्याच्या नावाने ठेवा, असा संताप भारतीय जनता पक्षाचे आमदार गाेपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. Gopichand Padalkar
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसाेबत केली हाेती. यावर संताप व्यक्त करताना पडळकर म्हणाले, मतांच्या राजकारणासाठी तुम्ही कुठे चालला आहात?टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांसोबत तुलना करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्याचा काही विषयच नाही. ज्याने हजारो हिंदूंची हत्या केली आहे त्यांची तुलना तुम्ही शिवरायांशी करत आहात इतके नीच राजकारण सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तु्म्ही इतक्या नीच लोकांची तुलना करतात परत त्यावर आंदोलने करतात हे शोभनीय नाही. आता निवडणूक होऊन गेली. 2029 मध्ये निवडणूक आहे. आता असे वक्तव्य का करत आहात? Gopichand Padalkar
आमदार पडळकर म्हणाले की, शिवाजी महाराज यांनी जे काम केले ते संपूर्ण जगाला माहिती आहे, ते काही पक्षाचे राजकारण आहे का? शिवाजी महाराज देशाची अस्मिता आणि स्वाभिमान आहेत. त्यामुळे असे जे कोणी बोलत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. जनता त्यांना वेळोवेळी योग्य जागा दाखवते. टिपू सुलतान काही राष्ट्रपुरुष नाही. सार्वजनिक ठिकाणी असलेले त्यांचे फोटो काढण्यात यावे. त्याचे नाव चौकाला देणं थांबवले पाहिजे. काँग्रेसची विचारधाराच ही राहिलेली आहे म्हणून ते रसातळाला गेले आहेत.Gopichand Padalkar
गोपीचंद पडळकर म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण हा त्यांच्या दोन्ही पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर त्यांचे नेते बोलू शकतील मी त्यावर काही बोलू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदेंची मुळ शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आहे. त्यामुळे या विलीनीकरणाचा काही फरक पडणार नाही. अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले हे निधन अत्यंत दुर्दैवी आहे. त्यावर कुणी शंका निर्माण करत असेल तर त्यावर यंत्रणा स्पष्टीकरण देतील. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक कामे केली आहेत. Gopichand Padalkar