विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपामध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही परत आलं पाहिजे, अशी ऑफर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. Ganesh Naik
महायुतीमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरावरील वर्चस्वावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय संघर्ष सुरू आहे. गेल्या दाेन दिवसांपासून दाेघांमध्ये वाकयुध्द सुरू आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना माजी करून टाकीन असा इशारा गणेश नाईक यांनी दिला हाेता. त्यावर माझ्या नादी लागू नका असे प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिले. एवढीच खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणुकीत आमच्याविरोधात लढा, असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिलं होते.
या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेशाची ऑफर देताना संजय राऊत म्हणाले की, हा भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एक दिवस एकनाथ शिंदे यांना तुरुंगात जावं लागेल, असे गणेश नाईक म्हणत आहेत. मात्र त्यांना पाठबळ मिळत आहे का? तर नाही. गणेश नाईक यांना ही लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही. पाठबळ असेल तर कारवाई व्हायला हवी.
ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधील एका मंत्र्यावर पोरकटासारखे हल्ले करताहेत. ते पाहता माझं गणेश नाईक यांना आवाहन आहे की, तुम्हाला ही लढाई भाजपामध्ये राहून कधीच लढता येणार नाही. तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलं आहे. तुम्ही स्वगृही आलं पाहिजे. तुम्ही शिवसेनेच्या मूळ प्रवाहात आलं पाहिजे आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे.
You can’t fight in BJP, come home: Sanjay Raut’s offer to Ganesh Naik
महत्वाच्या बातम्या
- व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल
- Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा
- “तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल
- संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया