Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरर होणाऱ्या टीकेवर उत्तर देण्यासाठी आता सपकाळ यांची मुलगी गार्गी मैदानात

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा:  Harshvardhan Sapkal  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने त्यांच्यावर संताप व्यक्त होत आहे. त्यांची जीभ कापण्याचीही धमकी दिली जात आहे. वडिलांवर होणाऱ्या टीकेवर उत्तर देण्यासाठी आता सपकाळ यांची मुलगी गार्गी सपकाळ मैदानात उतरल्या आहेत.Harshvardhan Sapkal

गार्गी सपकाळ मांडल्या, शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी कार्य केलं. महाराजांप्रमाणेच त्यांनी कुठल्याही विखारी, विषारी विचारांना थारा दिला नाही, हा त्या वक्तव्याचा आशय होता. माझ्या वडिलांच्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरुन सध्या राज्यात जाणीवपूर्वक गदारोळ उभा केला जात आहे. हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी नाही, तर त्यांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे. ज्यांनी सातत्याने महाराजांच्या विचारांना आणि इतिहासाला विकृत करण्याचं काम केलं आहे, तेच आज अचानक अपमान झाल्याचं ढोंग करत आहेत, हीच या संपूर्ण गदारोळामागची खरी राजकीय चाल असल्याचा आरोप गार्गी यांनी केला आहे.Harshvardhan Sapkal



विविध जाती आणि धर्मांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तेढीच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी अशी मागणी केली होती की सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महामानवांचे फोटो लावावेत, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतान यांचेही फोटो असावेत. ‘या मागणीकडे आपण कसं पाहता?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरात, वरील संदर्भात हे वक्तव्य करण्यात आलं. पण आज त्याच वक्तव्याचा हेतुपुरस्सर विपर्यास केला जात आहे, असा आरोप गार्गी यांनी केला.

गार्गी सपकाळ म्हणाल्या, यांच्याच लाडक्या भगतसिंग कोश्यारी यांनी ‘शिवाजी महाराज आता जुने झाले, नवे आयडॉल नितीन गडकरी’ अशी अपमानास्पद तुलना केली, फुले दाम्पत्याचा अपमान केला, तेव्हा या सत्ताधाऱ्यांच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. उलट अशा व्यक्तीला महाराष्ट्रभूषण देऊन त्यांनी महाराजांप्रती आपली खरी मानसिकता उघडी पाडली. कोरटकर या मा. फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीकडून महाराजांचा अपमान होतो, तेव्हा हे गप्प बसतात. ‘मोदी म्हणजे शिवाजी महाराज’ अशी इतिहासाची विकृती करणाऱ्या महंतांना प्रश्न विचारत नाहीत. राजमाता जिजाऊसाहेबांबद्दल वादग्रस्त आणि अवमानकारक लिखाण करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना कधी जाब विचारला गेला नाही. म्हणजे जेव्हा अपमान त्यांच्या विचारसरणीतून होतो तेव्हा तो चालतो, हीच या सत्ताधाऱ्यांची दुटप्पी, दडपशाही आणि निवडक नैतिकतेची राजकारणाची परंपरा आहे.

Harshvardhan Sapkal’s Daughter Gargi Enters Fray to Counter Criticism Against Him

महत्वाच्या बातम्या