विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे. पायलटकडून काही दुर्लक्ष झाले असेल, तर ते सीबीआयच्या (CBI) चौकशीत निश्चितपणे समोर येईल. मात्र, सकृतदर्शनी विमान कंपनी या दुर्घटनेला मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मला वाटते,असे सांगत या अपघाताची सीबीआय चाैकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. Praful Patel
अजित दादा यांचे जाणे ही फार दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या सखोल तपास विविध यंत्रणेद्वारे होत आहे. राज्य सरकार सुद्धा तपास करत आहेत. परंतु यामध्ये अनेक लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. अचानकपणे एवढी मोठा दुर्घटना कशी होऊ शकते, याची सीबीआय द्वारा चौकशी करण्यात यावी आणि ही महाराष्ट्रात घटना झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार याबाबत सीबीआयला चौकशी करण्यात सांगू शकते. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही काल निवेदन देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
“पायलटने अजितदादांचे विमान मुद्दामहून खाली पाडले,” असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावर प्रफुल पटेल म्हणाले, “मी एक जबाबदार व्यक्ती आहे. अनेक वर्षांच्या राजकारणात आणि सरकारमध्ये माझा अनुभव राहिलेला आहे. मी जे काही बोलेन ते संयमाने आणि जबाबदारीने बोलेन. माझ्याकडे तथ्य असल्याशिवाय कुठलाही आरोप-प्रत्यारोपचे उत्तर देणे मला योग्य वाटत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना यावेळी बाेलताना प्रफुल पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत मोठी घोषणा केली. आगामी २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, असे पटेल यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे ही पक्षाची जबाबदारी असल्याचे पटेल यांनी नमूद केले. ते म्हणाले, “अजितदादांच्या निधनानंतर ही वेळ विलीनीकरणावर चर्चा करण्याची नाही. आज आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमची संघटनात्मक पदे किंवा विधिमंडळ नेतृत्वाची जागा भरण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत.”
अजित दादांचा अपघात होण्यापूर्वी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा त्यांना फोन केला होता, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “अजित पवारांच्या निधनाच्या आदल्या दिवशी मी त्यांना फोन केला होता. पण शेतकऱ्यांसाठी केला होता. कुणाची खासगी फाईल किंवा कुणाला मदत करण्यासाठी केला नाही. एक उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी त्या दिवशी माझा फोनसह अनेक लोकांचे फोन त्यांना आले असतील. अनेकांनी त्यांना वेगवेगळ्या कामांची निवेदने दिली असतील. याचा अर्थ मी कुठल्याही कारणाने त्यांना थांबवण्याचे काम केले असा होत नाही. मी तेव्हा दिल्लीत होतो आणि अजित पवार कुठे आहेत हे मला माहीत नव्हते. मी त्यांना दिल्लीतून फोन केला होता”
Praful Patel Demands CBI Probe, Says Airline Bears Maximum Responsibility in Ajit Pawar Plane Crash
महत्वाच्या बातम्या
- व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल
- Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा
- “तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल
- संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया