मेट्रो, विमानतळ आणि नदी पुनर्जीवनावर विशेष भर द्या, मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यामध्ये प्रलंबीत 16 महत्वाच्या विकास कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुण्यातील मेट्रो, विमानातळ आणि नदी पुर्नर्जीवन यावर भर देण्यात येणार आहे. विकास प्रकल्प दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावेत अशा सूचना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या आहेत. Murlidhar Mohol

शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शहराच्या प्रगतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या 16 प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर, विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाचे निर्णय

महामेट्रो मार्फत वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांची कामे लवकरच सुरू होणार करण्याबाबत निर्णय.

विमानतळाला मेट्रो कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सहा पर्यायी मार्गांवर चर्चा होऊन त्यापैकी व्यवहार्य मार्ग अंतिम करण्यात आला आहे.

खडकवासला ते हिंजवडी या नव्या मेट्रो मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना.

पीएमआरडीएच्या माध्यमातून साकारत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले असून एप्रिलअखेर २३ पैकी १३ स्थानके पूर्ण करण्याचे नियोजन.

पुणे विमानातळ परिसरातील येरवडा कारागृह ते विमानतळ आणि कल्याणीनगर ते विमानतळ या रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाच्या कामांना सुरुवात झाली असून आवश्यक त्या ठिकाणी भूसंपादन प्रक्रियाही करण्याचे सुरु आहे. विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी पर्यायी रस्ता उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा.

राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत नदीकाठ सुधारणा आणि नदी पुनर्जीवनाची कामे वेगाने सुरू असल्याची माहिती तसेच समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेत गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना.



शहरातील वायूप्रदूषणात वाढ झाल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना. तसेच बांधकामस्थळांवरील धूळ नियंत्रण, रस्ते स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सुचना.

चांदणी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची विकासकामे, गदिमा स्मारक तसेच लहुजी वस्ताद स्मारक या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृह इमारतीच्या कामांनाही गती देण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या.

Focus on Metro, Airport and River Revival: Murlidhar Mohol Issues Key Directives

महत्वाच्या बातम्या