विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांची गुरुवारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी रात्री उशिरा महाराष्ट्रासह देशातील काही महत्वाच्या राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर केली. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्रासाठी पूर्णवेळ म्हणून कार्यरत असणार आहेत.
विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल होते. सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती नियुक्त करण्यात आल्यानंतर आचार्य देवव्रत यांची गुजरातसह महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिष्णू देव वर्मा त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री असून ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा स्वीकारला आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. नंदकिशोर यादव यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारच्या राज्यपालदी, तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपालपदी, केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी, लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपालपदी, दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे.
Former Tripura Deputy CM Jishnu Dev Varma Appointed New Governor of Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Uday Samant : दावोस करारांवर लवकरच ‘भगवी पत्रिका’; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
- Mundhe : तुकाराम मुंडे यांचा कारवाईचा बडगा, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारे 316 अधिकारी – कर्मचारी निलंबित
- Navnath Bane : उबाठा गटाचे निर्णय आता उद्धव ठाकरे नव्हे, तर संजय राऊत घेऊ लागलेत ! नवनाथ बन यांची टीका
- पुण्यातील प्रसिद्ध वसतिगृहात विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार; कारणही धक्कादायक, अनेक विद्यार्थी जखमी!