विशेष प्रतिनिधी
पुणे : Author Vishwas Patil कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर प्रसिद्ध साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि निवृत्त सनदी अधिकारी विश्वास पाटील यांची आज पुण्यात उलटतपासणी घेण्यात आली. ही उलटतपासणी महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी घेतली.Author Vishwas Patil
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘संभाजी’ या कादंबरीतील अंत्यविधी संदर्भातील कथनावरून महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी वाद निर्माण झाला होता. काही गटांनी संभाजी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीने केल्याचा दावा करत दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेच्या संदर्भात आयोगासमोर सध्या सुनावणी सुरू आहे.Author Vishwas Patil
उलटतपासणीदरम्यान विश्वास पाटील यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या अंत्यविधीबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये स्पष्ट उल्लेख आढळत नाही. तसेच त्यांच्या ‘संभाजी’ कादंबरीतील काही उल्लेख पूर्णतः काल्पनिक असल्याची कबुली त्यांनी दिली. जना परिटीन, गोविंद नाक, दामाजी पाटील आणि पाटलीन यांसारख्या पात्रांचे संदर्भ कादंबरीत आले असले तरी ते ऐतिहासिक पुराव्यावर आधारित नसून कल्पित स्वरूपाचे आहेत, असे त्यांनी आयोगासमोर स्पष्ट केले.
अॅड. शिशिर हिरे यांनी उलटतपासणीदरम्यान जेधे शकावली, मासीरे आलमगीर, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना आणि खाफी खान या तत्कालीन इतिहासकारांच्या ग्रंथांचा संदर्भ देत कादंबरीतील काही कथनांवर प्रश्न उपस्थित केले.
या वेळी विश्वास पाटील यांनी असेही नमूद केले की, आपल्या लिखाणाचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण केली जात असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. दरम्यान, कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आयोगाच्या सुनावणीत या प्रकरणातील विविध साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी सुरू आहे.
Author Vishwas Patil Admits Fictional Elements in ‘Sambhaji’ During Cross-Examination Before Koregaon Bhima Commission
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा