विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी संशय व्यक्त करत राज्यात राजकीय वातावरण तापवले आहे. हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला असून या संदर्भात काही तांत्रिक बाबी आणि पुरावेही त्यांनी समोर आणले आहेत. दरम्यान, भाजप युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने या प्रकरणाला वेगळे वळण देत अपघातासाठी रोहित पवार यांच्या साखर कारखान्यालाच जबाबदार ठरवले आहे. Rohit Pawar
भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या दुर्घटनेची सखोल तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात असा दावा केला आहे की, पुणे जिल्ह्यातील शेठफळ गडे येथे रोहित पवार यांचा साखर कारखाना आहे. या कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरात दृश्यमानता कमी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या धुराचा विमान दुर्घटनेशी काही संबंध आहे का, याची वैज्ञानिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. Rohit Pawar
सोलनकर यांनी पत्रात पुढे नमूद केले की, कारखान्यातून होणाऱ्या उत्सर्जनामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि त्वचारोगासारख्या समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच या प्रदूषणाचा शेतीवरही परिणाम होत असल्याचे सांगितले जाते. अपघाताच्या दिवशी बारामती परिसरात या कारखान्याच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाली होती का किंवा औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुके तयार झाले होते का, याची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Rohit Pawar
तसेच या संदर्भात रोहित पवार यांनी स्वतः कारखान्याच्या धुराचा विमानतळाच्या सुरक्षिततेवर काही परिणाम होतो का, याबाबत सविस्तर सादरीकरण करावे, असेही त्यांनी सुचवले आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी दिल्लीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत चर्चा केली आणि गेल्या काही दिवसांत जमा केलेल्या माहितीचे सादरीकरण केजरीवाल यांच्यासमोर मांडले. Rohit Pawar
रोहित पवार यांनी सांगितले की, अजितदादांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. या विषयावर ‘आप’च्या खासदारांनी संसदेत आवाज उठवावा, अशी विनंती त्यांनी केजरीवाल यांच्याकडे केली. केजरीवाल यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या लढ्यात साथ देण्याचा विश्वास दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
BJP Youth Leader Links Ajit Pawar Plane Crash to Rohit Pawar’s Sugar Factory, Seeks Probe
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा