विशेष प्रतिनिधी
पुणे : Mahadev Jankar अजितदादांचा हा मृत्यू अपघात होता की घातपात, याबाबत महाराष्ट्रातील ९९ टक्के जनतेच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी रासप’चे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे.Mahadev Jankar
जानकर म्हणाले, “अजित दादांसारख्या मोठ्या लोकनेत्याचा अशा पद्धतीने मृत्यू होतो, तेव्हा जनमानसात शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. सध्या जो सरकारी अहवाल समोर येत आहे, त्यावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे केवळ पोलीस तपासावर विसंबून न राहता, या प्रकरणाचे ‘दूध आणि पाणी’ वेगळे करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा.”Mahadev Jankar
केवळ सीबीआय चौकशीच नव्हे, तर या तपासाच्या निष्पक्षतेसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. “या प्रकरणामागे कोणतेही मोठे राजकीय कारस्थान दडलेले नाही ना, हे शोधणे गरजेचे आहे. जर सरकारला आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल, तर त्यांनी या उच्चस्तरीय चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. जे सत्य असेल ते जनतेसमोर आलेच पाहिजे, ही आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर आता अनेक नेत्यांनी त्यांना पाठिंब्याची भूमिका घेतली आहे.
99% of People Suspect Foul Play in Ajit Pawar Crash, Claims Mahadev Jankar
महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Patil : जूनपासून शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण; चंद्रकांत पाटील यांची घोषणा
- Pune Metro : पुणे मेट्रोचा ‘विमेन्स डे’ धमाका: आता हक्काची जागा मिळणार!
- Jay Pawar : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जय पवार उद्या घेणार पत्रकार परिषद
- Raksha Khadse : क्रिकेटसह इतर अनेक खेळांमध्येही उज्वल भविष्य, रक्षा खडसे यांचे आवाहन