विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (PMC) स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) सात नावांची निश्चिती केली आहे. या पदासाठी सुमारे ४०० इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दिले होते. त्यात या सात जणांची निवड करण्यात आली आहे. BJP
पुणे महानगरपालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश मधुकर बिडकर यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत या नावांची अधिकृत घोषणा केली. भाजपच्या वतीने निलेश कोंढाळकर, प्रियांका शेळके, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेले यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
दुसरीकडे, इतर पक्षांनीही आपली नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसकडून सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) राकेश कामठे आणि दत्ता धनकवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. BJP
पक्षनिहाय जागांचे गणित
महानगरपालिकेतील संख्याबळानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळत असतात याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- भाजपा नगरसेवक:119
स्वीकृत सदस्य 7 जागा - राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक:27
स्वीकृत सदस्य 2 जागा - राष्ट्रीय काँग्रेस पक्ष:15
स्वीकृत सदस्य 1
विद्यमान नियमांनुसार, महापालिकेत एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाते. यामध्ये आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक कार्य आणि महिला व बाल कल्याण अशा विशेष क्षेत्रांतील तज्ज्ञांची निवड होणे अपेक्षित असते. BJP
स्वीकृत सदस्यांचे अधिकार
महाराष्ट्र महानगरपालिका (MMC) अधिनियमानुसार:
स्वीकृत सदस्यांना सर्वसाधारण सभेत चर्चेत सहभागी होण्याचा आणि प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो.
परंतु, त्यांना मतदानाचा अधिकार नसतो.
हे सदस्य प्रभाग समित्यांमध्ये देखील काम करू शकतात. यासाठी ते संबंधित प्रभागातील नोंदणीकृत मतदार असणे आणि मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेशी (NGO) संबंधित असणे आवश्यक आहे. BJP
या संदर्भातील अंतिम निर्णय १८ मार्च रोजी पुणे महानगरपालिकेचे निवडणूक आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून घेतला जाईल.
BJP Announces Seven Nominees; Congress and NCP Also Pick Their Candidates!
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा