विशेष प्रतिनिधी
पुणे : Teacher recruitment राज्यात शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला असतानाही अद्याप प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ‘पवित्र पोर्टल’ अंतर्गत शिक्षक भरती तातडीने सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी पुण्यात पात्र उमेदवारांनी मोठे आंदोलन केले. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या उमेदवारांनी आंदोलनात सहभाग घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.Teacher recruitment
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी परीक्षा दिली असून अनेक उमेदवार पात्र ठरले आहेत. मात्र परीक्षा होऊनही भरती प्रक्रिया रखडल्याने जवळपास दोन लाख पात्र उमेदवारांचे भविष्य अधांतरी असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. दीर्घकाळापासून भरतीबाबत कोणतीही ठोस घोषणा होत नसल्याने उमेदवारांमध्ये संताप वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.Teacher recruitment
आंदोलनादरम्यान उमेदवारांनी ‘पवित्र पोर्टल’द्वारे पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया राबवून तातडीने नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी केली. अनेक उमेदवारांनी वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा दिली असून पात्र ठरल्यानंतरही नियुक्ती न मिळाल्याने आर्थिक आणि मानसिक ताण सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. काही उमेदवारांनी तर वयोमर्यादा संपण्याची भीतीही व्यक्त केली.
राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत असल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी शासनाने तातडीने निर्णय घेत भरती प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. सरकारकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
Teacher recruitment delayed despite exams; Recruitment under ‘Pavitra Portal’ urgently; Eligible candidates protest in Pune
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा