विशेष प्रतिनिधी
पुणे : दहावीच्या गणित आणि विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका फसव्या टेलिग्राम ग्रुपकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मंडळाने सांगितले. MSBSHSE
मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.४७ वाजता एका टेलिग्राम ग्रुपवर विज्ञान भाग १ आणि भाग २ च्या प्रश्नपत्रिका विक्रीस उपलब्ध असल्याचा संदेश प्रसारित करण्यात आला होता. या संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. MSBSHSE
या संदेशाची सत्यता पडताळण्यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने १० मार्च रोजी सापळा कारवाई केली. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी टेलिग्राम ग्रुपच्या अॅडमिनशी संपर्क साधून ११ मार्च रोजी होणाऱ्या विज्ञान भाग १ च्या प्रश्नपत्रिकेची मागणी केली.
ग्रुपच्या अॅडमिनने मागणी केल्यानुसार अधिकाऱ्यांनी ६०० रुपये भरून प्रश्नपत्रिका मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र परीक्षा सुरू होण्यापूर्वी संबंधित ग्रुपकडून विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली नाही. MSBSHSE
तपासात असेही आढळून आले की, गणित भाग २ ची प्रश्नपत्रिका परीक्षेची अधिकृत वेळ संपल्यानंतरच टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करण्यात आली होती.
डॉ. माळी यांनी सांगितले की, या प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे की टेलिग्राम ग्रुप चालवणारे काही जण प्रश्नपत्रिका फुटल्याचा खोटा दावा करून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होते. MSBSHSE
या ग्रुपकडून अनेक विद्यार्थ्यांना वैयक्तिक संदेश पाठवून प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवत पैसे मागितल्याचेही समोर आले आहे. मात्र परीक्षा सुरू होण्यापूर्वी कोणतीही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही, असे मंडळाने स्पष्ट केले. MSBSHSE
“प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असे डॉ. माळी यांनी सांगत मंडळाला परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याबाबत कोणतीही ठोस तक्रार प्राप्त झालेली नाही, असेही स्पष्ट केले.
दरम्यान, फसव्या टेलिग्राम ग्रुपमागील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
No Class 10 Paper Leak, Fraudulent Telegram Group Misled Students: MSBSHSE
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक
- गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी
- एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन
- महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन