Jitendra Dudi : पुण्यात गॅस टंचाई नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

पुणे : Jitendra Dudi  शहर आणि जिल्ह्यात गॅस टंचाईबाबत विविध अफवा पसरत असताना प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.Jitendra Dudi

जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक आणि तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या गॅसची कोणतीही टंचाई निर्माण झालेली नसून नागरिकांना नियमितपणे सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे, असे प्रशासनाने सांगितले.Jitendra Dudi



दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्व गॅस एजन्सींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर फिरती आणि दक्षता पथकेही गठित करण्यात आली आहेत. कोणत्याही गॅस वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधितांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

तसेच रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक सेवांना आणि विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलेंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचनाही प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

No Gas Shortage In Pune, Don’t Believe Rumours: Collector Jitendra Dudi

महत्वाच्या बातम्या