विशेष प्रतिनिधी
मुंबई : Parth Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कपंनीवर अनेक गंभीर आरोप केले. रोहित पवारांनी वारंवार सर्वांनाच या कंपनीच्या विमानातून कोणताही प्रवास करू नका, असे आवाहन केले आहे. मात्र, भावाने आवाहन करूनही खासदार पार्थ पवार यांनी मंगळवारी (दि. 28 एप्रिल) व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला. यावर पार्थ पवारांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.Parth Pawar
राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यानंतर त्यांच्या या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. तसेच, ज्या VSR कंपनीच्या विमान अपघातात तीन महिन्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच विमानात मुलगा जातो? त्या VSR कंपनी च्या चौकशीची मागणी करायचे सोडून, त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातात ? असे प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केले. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. अशातच आता पार्थ पवारांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबतचे सविस्तर स्पष्टीकरण देत विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार तत्काळ रद्द केल्याचे सांगितले आहे.Parth Pawar
मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत…
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) April 28, 2026
खासदार पार्थ पवारांनी मुंबई ते पुणे प्रवासाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “मोदी बाग, पुणे येथे शरद पवारांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत.” असे पार्थ पवारांनी सांगितले आहे.
माझ्या कर्मचारीवर्गाला आणि सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. VSR Aviation बाबत बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही.” असे खासदार पार्थ पवारांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना उत्तर देत म्हटले आहे.
Parth Pawar explains travel on VSR company aircraft
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन