महायुतीतील विधानपरिषद जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार; गिरीश महाजनांचा दावा

विशेष प्रतिनिधी

 

पुणे: विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी तिन्ही पक्ष बसून निर्णय घेतील.प्रत्येक पक्षाला आपल्या जागा मिळाव्यात त्याप्रमाणे मागणी होत असते.मात्र लवकरच यावर तोडगा निघणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, ‘ विधानपरिषदेच्या सर्व जागांसाठी आमची एकत्र चर्चा झाली आहे.आम्ही आमचा रिपोर्ट आमच्या पक्षाला दिला आहे.आता जागांसंदर्भात महायुतीमधील तिन्ही पक्ष बसून चर्चा करून आणि जागावाटपाचा तिढा सोडवतील.जळगाव, नाशिक आणि इतर जागांबाबत तिढा आहे, पक्ष संख्याबळानुसार तिकीट मागत आहेत.मात्र पुढील एक दोन दिवसात हा तिढा सुटेल ‘ असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.



नाशिक जळगाव जागेचा तिढा सुटणार?

मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी या मतदारसंघातून निवडून लढण्याची इच्छा दर्शवली आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर,त्यापद्धतीने जागावाटप होईल आणि निर्णय घेण्यात येईल, असे गिरीश महाजने म्हणाले.नाशिक आणि जळगाव दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे.मात्र या जागांबाबत मुख्यमंत्री देवसंत फडणविस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे बैठक घेऊन निर्णय घेतील.पुढील दोन दिवसात विधानपरिषद जागांबाबत तिढा सुटेल, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

पेट्रोल डिझेलची समस्या नाही..

पेट्रोल आणि डिझेलची कुठेही टंचाई नाही,मात्र नागरिकांकडून काळाबाजार करण्यात येत आहे. बाजारात प्लास्टिकच्या कॅन विकत मिळत नाहीयेत एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येतोय. शेतकरी सोडले तर 80 टक्के नागरिक हे काळाबाजार करण्यासाठी पेट्रोल डिझेलची खरेदी करत आहेत. असे आरोप गिरीश महाजन यांनी केले.

The dispute over the distribution of Legislative Council seats in the Mahayuti will be resolved soon; Girish Mahajan claims

महत्वाच्या बातम्या