विशेष प्रतिनिधी
सातारा: विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीमध्ये सुरज निर्माण होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकासआघाडी कडून बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेगाला असून, महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्या रणनीती आखायला सुरुवात केली आहे.सांगली आणि सातारा मतदारसंघात एकूण ४७९ मतदार आहेत.संख्याबळानुसार भाजपा आणि महायुती मजबूत ठरत आहे.भाजपाकडे २४२ सदस्यांचे संख्याबळ आहे.तरी स्थानिक पातळीवरील नाराजी आणि अंतर्गत गटबाजीमुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीला गटबाजीचा फटका बसणार?
सातारा जिल्हा परिषद आणि काही स्थानिक पातळीवरील काही नाराज गटांमुळे महायुतीसमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.स्थानिक नेत्यांमध्ये असलेली नाराजी आणि मतभेद याचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे संख्याबळ असताना देखील, स्थानिक समीकरणे आणि क्रॉस वोटिंगचा फटका महायुतीला बसणार असल्याचे बोलेल जात आहे.
दरम्यान, महायुतीमध्ये उमेदवारीवरून मोठ रस्सीखेच पाहायला मिळत आहे.सातारा आणि सांगली विधान परिषदेची जागा भाजपकडे जाणार हे निश्चित असले तरी, सांगली आणि सातारा येथील अनेक पदाधिकारी आणि नेते इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना भाजपाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
Will the Mahayuti be hit by factionalism? Political equations will change in Satara – Sangli..
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश