विशेष प्रतिनिधी
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्यपाल कोट्यातील आमदार इद्रिस नायकवडी यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचा सूचना देण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.१५ दिवसांपूर्वी उपाख्यमंत्र्यांचा ओएसडीने नायकवडी यांना राजीनामा देण्याचा निरोप दिल्याचे सांगितले जात आहे.राष्ट्रवादीतील युवनेतृत्वाकडून हा राजीनामा मागवून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
इद्रिस नायकवडी काय म्हणाले?
नायकवडी म्हणाले की, ‘ पक्षातील काही लोकांकडूह अशा वावड्या उठवल्या जात आहेत.पक्षातील काही लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या नसल्यामुळे ते अपेक्षा करत असतील.मात्र, पक्षाकडून माझ्याकडे राजीनाम्याची कोणतीही मागणी झाली नाही.
ओएसडी भेटीबद्दल नायकवडी म्हणाले की, ‘ मी आमदार आहे. माझ्याकडे ओएसडी नेहमी येत असतात.परस्पर चर्चा घडत असेल, पण माझ्यापर्यंत निरोप आला नाही.
२०२४ मध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून इद्रिस नायकवडी यांची आमदार पदी नियुक्ती करण्यात आली होती.२०३० पर्यंत नायकवडी यांचा आमदारकीचा कार्यकाळ आहे.
राजीनाम्याची कोणतीही मागणी नाही…
पंधरा दिवसांपूर्वी इद्रिस नायकवडी यांना मंत्र्यांच्या ओएसडी कडून निरोप पाठवण्यात आला होता. ओएसडी राजीनाम्याचा नमुना घेऊन आमदार नायकवडी यांना भेटले होते. मात्र मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका नायकवडी यांनी घेतल्याचे सांगितले जात होते.मात्र, त्यावर नायकवडी यांनी नकार दिला आहे.माझ्याकडे अशी कोणतीही मागणी करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Idris Nayakwadi’s resignation sparks discussion; MLA says – “This is just a rumor”
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश