विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल कारागृहातून सुटताच अगरवाल कुटुंबाने जंगी पार्टी आयोजित केल्याचे बोलले जात आहे.आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत विशाल अगरवाल गळ्यात पैश्याचा हार घालून नाचताना निदर्शनास येत आहे.सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
व्हिडिओत विशाल अगरवाल आणि त्याचे कुटुंबीय गाण्यावर नाचत जल्लोष साजरा करताना दिसत आहेत.
पोर्शे अपघात प्रकरणात आरोपी असलेल्या विशाल अगरवाल याला काही दिवसांपूर्वी कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता.मिळालेल्या माहितीनुसार कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर अगरवाल कुटुंबाने या पार्टीचे आयोजन केले होते.
पुण्यातील कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती.या प्रकरणातील आरोप आणि विशाल अगरवालच्या मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.मात्र हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्याला जमीन देखील मिळाला होता.पुढे विशाल अगरवाल पोलिसांकडून अटक करण्यात आली होती,मात्र आता त्याचीसुद्धा जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
Vishal Agarwal’s celebration after being released on bail? Video goes viral on social media
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश