विशेष प्रतिनिधी
मुंबई : ते स्वत: आमदार आहेत. त्यांच्या मुलीला प्रभाग समिती दिलेली आहे. शिवसेनेत उपनेतेपद आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे असा प्रश्न पडत आहे? आम्ही यांना काही कमी दिलेले नाही, आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले आमदार सचिन अहिर यांच्या घरातील पदांची यादीच माेजून दाखविली.
आठ दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर उध्दव ठाकरेंनी फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्याविरोधात मोठा हल्लाबोल केला. परंतु, शिंदेंच्या या धक्क्यातून ठाकरे सावरत नाही तेच आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का एकनाथ शिंदेंनी दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिंदेंनी ठाकरे गटातील विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांना गळाला लावले आहे.
आमदार सचिन अहिर यांनी साथ सोडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवन येथून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गेले चार वर्षे आम्ही पाहतोय की, ज्यांना सगळं काही मिळत आहे ते स्वत:च्या स्वार्थासाठी निघून जात आहेत. हे आम्ही गेल्या काही काळापासून पाहत आहे, त्यामुळे यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. वरळी-शिवडी हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे.
आमचे तिकडचे काम बोलते, त्यामुळे कोणी येण्याने किंवा जाण्याने धक्का काही बसत नाही. मात्र एकच दुर्दैवाच आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिले, त्यांना अजून काय पाहिजे? ते असेही नाही म्हणू शकत की आदित्य ठाकरे भेटतच नाहीत. ते स्वत: आमदार आहेत, त्यांच्या मुलीला प्रभाग समिती दिलेली आहे. आमदार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेतेपद आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे असा प्रश्न पडत आहे? आम्ही यांना काही कमी दिलेले नाही, आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का?
आदित्य ठाकरे म्हणाले, हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. हे अभ्यासातून लक्षात आले आहे. हे ऑपरेशन फडणवीस आहे. हे लक्षात आले आहे. सकाळी त्यांनी मेसेज पाठवला वरळीतून उभा राहणार नाही. हे म्हणण्याच्या गोष्टी आहेत. उभे राहिले तरी काही फरक पडत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना सवाल आहे, आज उपसभापती डोक्यावर बसला. तुमच्यातील का नाही बसला. हा भाजपने विचार केला पाहिजे. हे ऑपरेशन फडणवीस आहे.
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आपल्या राजकीय भवितव्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ठाकरे गटाला माेठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून निवडून आणण्यात सचिन अहिर यांनी महत्वाची भूमिका निभावली हाेती.
Should We Sing Your Praises Every Day?” Aaditya Thackeray Lists Sachin Ahir Family’s Political Posts
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली