विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपशी युती तोंडणे, हिंदुत्वाशी फारकत घेणे, काँग्रेसचा विचार स्वीकारणे यामुळेच उबाठावर ही वेळ आली आहे. 2019 मध्ये जर मुख्यमंत्रीपदासाठी काही केले नसते तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री झाले असते. चांगल्या पद्धतीने सरकार चालले असते. मनपा हातात असते. तुम्ही स्वत:च मुख्यमंत्री झाले. घराणेशाही करणारे लोकं बरबाद झाले आहेत, अशी टीका ज्येष्ठ भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. Chandrashekhar Bawankule
ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून बावनकुळे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आता पक्षातून केवळ आदित्य ठाकरे बाहेर पडायचे राहिले आहेत, असा टाेल त्यांनी लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नुसती टीका करणे आणि भाषणं करणे यामुळे पक्ष चालत नसतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष सांभाळला पाहिजे. त्यांच्या पक्षातील नेते सोडून जात आहे. उद्धव ठाकरे यांना जेव्हा अंतर्गत गटबाजीबद्दल कळाले तेव्हाच त्यांनी दौरा करणे गरजेचे होते. मुख्यमंत्री असताना लोकांना भेटले असते तर इतकं काहीच घडले नसते. मुख्यमंत्रीपद मिळवण्याकरता त्यांनी हातचे सर्वच घालवले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सचिन अहिर जाणे या पेक्षा मोठे ते काय असणार आता पक्षातून आदित्य ठाकरे जायचे राहिले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी अहंकार सोडला पाहिजे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाढतो आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष संपतोय. तो त्यांचा दोघांचा विषय आहे. यामध्ये भाजपचा काही संबंध नाही. कार्यकर्ते सोडून जात आहेत कारण त्यांना अहंकार आहे. सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे हे सर्व सुरू आहे.
Abandoning Hindutva and Embracing Congress Ideology Led UBT to This Situation: Chandrashekhar Bawankule
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली