विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chandrashekhar Bawankule राज्यात आमचे अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. राज्याला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून लाभावे, ही महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची भावना आहे. महाराष्ट्रात 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील, असे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.Chandrashekhar Bawankule
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस हे 2029 पूर्वी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा केली होती. त्यानंतर आता त्यांनी मोठे विधान केले आहे. “देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले, तर चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतील,” असे विधान त्यांनी केले. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अशामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत यांना टोलाही लगावला आहे.Chandrashekhar Bawankule
मोशी दुर्घटनेनंतर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाचे कामच केवळ आरोप करणे आहे. पण, सरकार संपूर्ण क्षमतेने मदत आणि बचावकार्यात व्यस्त आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. “आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. पण ही एक खूप मोठी घटना असून यामध्ये सर्वांना वाचवण्याचे व मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्र सरकार, जिल्हाधिकारी, आमची संपूर्ण टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महानगरपालिकेची यंत्रणा अशा सर्वच यंत्रणा घटनास्थळी पूर्णपणे सक्रिय आहेत आणि मदतकार्य करत आहेत. विरोधकांनी काहीही दावे केले असले, तरी सरकार आणि संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणा लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना तात्काळ मदत देण्यासाठी कटिबद्ध असून संपूर्णपणे कार्यरत आहेत,” असा ठाम विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
Devendra Fadnavis will remain Maharashtra Chief Minister till 2034, Chandrashekhar Bawankule hits back at Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या