Gitesh Raut : गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, खोटं बोलून माझा विश्वासघात; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेचा आरोप

विशेष प्रतिनिधी

ठाणे :Gitesh Raut  ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा तथा मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात कौटुंबिक छळासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.Gitesh Raut

गिरीजा राऊत यांनी तक्रारीत राऊत कुटुंबीयांवर मानसिक व शारीरिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच, घरात जबरदस्तीने गोमूत्र पाजल्याचा आणि त्यांच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.Gitesh Raut



गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, विवाहानंतर आपल्यावर सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप केला. मुलासाठी विविध अघोरी विधी करण्यात आले, जबरदस्तीने गोमूत्र पाजण्यात आले, डोक्यावरील केस कापण्यात आले, तसेच विविध प्रकारच्या गोळ्या देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

याशिवाय, पती गितेश राऊत यांनी आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत आणि विवाहापूर्वी महत्त्वाची माहिती लपवून आपला विश्वासघात केल्याचा गंभीर आरोपही गिरीजा राऊत यांनी केला. 2018 नंतर आमच्यात कोणतेही शारीरिक संबंध झाले नसल्याचा दावा त्यांनी केला.

गिरीजा राऊत यांनी राजकीय प्रभावामुळे अनेक वर्षे आवाज उठवता आला नसल्याचे सांगत, आपल्यावर मानसिक दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला. तसेच, विनायक राऊत आमच्यासोबत राहत नसून वेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचाही दावा त्यांनी केला.

गिरीजा राऊत यांचे वकील अॅड. सागर कदम यांनी या प्रकरणात महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर कारवाईची मागणी केली. सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, अद्याप आरोपींकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Former MP Vinayak Raut’s daughter-in-law alleges Gitesh Raut concealed inability to maintain physical relations, accuses family of betrayal

महत्वाच्या बातम्या