विशेष प्रतिनिधी
मुंबई : बुडाला जळतंय आणि ते डोंगरावरची आग विझवायला पळत आहे, अशी जहरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे. Eknath Shinde
नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यावर टीका करताना शिंदे म्हणाले, आता हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल, त्यांचा नेहमीच सर्वांना बाहेरून पाठिंबा असतो, घरातून पाठिंबा असतो. तुम लढो हम कपडा संभालते है, अशी त्यांची सवय आहे.
एक म्हण आहे, बुडाला जळतय आणि डोंगरावर आग विझवण्यासाठी पळत आहे अशी उबाठाची अशी अवस्था झाली आहे. सोनम वांगचूक यांचे जे आंदोलन आहे, जेव्हा जेव्हा असे सरकारविरोधात आंदोलन असते, त्यांना यांचा पाठिंबा असतो. श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरले होते अशी मुद्दाम उबाठाचे लोक नेहमी आठवण करून देत आहेत, असे ठाकरेंनी म्हटले.
उबाठाच्या लोकांना आता वाटत आहे की, हे जे देशव्यापी विद्यार्थ्यांते आंदोलन सुरू आहे, त्यात आपली पोळी कशी भाजून घेता येईल, अशाप्रकारचे खालच्या थराच राजकारण करण्याचा हेतू त्यांचा आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये अराजकता कशी पसरेल, कायदा सुव्यवस्था कशी पसरेल आणि लोक रस्त्यावर येऊन आंदोलने कशी करतील अशा भ्रमामध्ये ही सगळी मंडळी आहे. खरं म्हणजे बांग्लादेश, नेपाळमध्ये अर्थव्यवस्था कोलमडलेली होती, लोकांचे खायचे हाल होते, मात्र आपला देश मोदींजींच्या नेतृत्वात प्रगती करत आहे, अनेकांना मोफत धान्य दिले जात आहे. 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचे काम या सरकारने केले आहे. हा त्या देशांमध्ये आणि आपल्या देशात फरक आहे, असे शिंदे म्हणाले.
2014 पूर्वी झालेले घोटाळे युवा वर्गाने पाहिलेले आहेत, त्यामुळे युवक आजपर्यंत मोदींसोबत आहे. या काळात झालेली देशाची प्रगती तो पाहत आहे. युवकांना काम मिळत आहे, युवक मोदींच्या सोबत आहे. त्यामुळे यांच्या मनात जे आहे, देशात अराजकता पसरली पाहिजे, देशात कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे, यासाठी हे लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. परंतू त्यांच्या प्रयत्नांना यश कधीच येणार नाही. कारण या देशाला आणि राज्याला एक संस्कृती आहे, हा एक केविलवाणा प्रयत्न आहेत. आधी हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले, आता रामरक्षा आंदोलन करत आहेत. आता त्यांना कळलं आहे, जो राम का नही, म्हणून रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. मी एवढंच सांगतो की, त्यांनी कितीही हिंदुत्वाचा आव आणला तरी त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच हिंदुत्व सुटलेले आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
The backyard is burning, but they’re rushing to douse a hill fire”: Eknath Shinde slams Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा