विशेष प्रतिनिधी
नागपूर :- लग्नाला दोन्ही कुटुंबीयांनी विरोध केल्याने निराश झालेल्या प्रेमीयुगलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यात तरुणाचा दुर्दैवी शेवट झाल्याची आहे. नागपूरच्या Nagpur वानाडोंगरी परिसरातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. तर तरुणीची प्रकृती गंभीर आहे.
मृत तरुणाचे नाव विशाल जावडे ( वय – २१ वर्ष ) असे आहे. विशाल हा मंडप डेकोरेशनचे काम करत होता तसेच ऑटो रिक्षाही चालवत होता. गेल्या चार वर्षांपासून त्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही विवाह करायचा होता आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमोर ही इच्छा व्यक्त केली होती. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध केल्याचे सांगितले जात आहे.
सोबत जगू शकणार नाही, म्हणून टोकाचा निर्णय !
रविवारी या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. सोबत जगू शकणार नाही, अशी कल्पना आल्याने त्यांनी सोबत मरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सोमवारी दुपारी हे प्रेमीयुगल वानाडोंगरी-संगम गाव मार्गावरील मोकळ्या मैदानात जाऊन विष घेतले. काही वेळेतच दोघांची प्रकृती बिघडल्याचे पाहून नागरिकांनी त्यांना तातडीने शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री ११ च्या सुमारास विशालचा मृत्यू झाला. तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
दोघांची जोड कायमची तुटली
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या. विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, याप्रकरणी अनपेक्षित मृत्यू अशी नोंद केली असून या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही कुटुंबीयांच्या अट्टहासापोटीच या प्रेमीयुगलाची जोडी कायमची तुटल्याचीही चर्चा आहे.
Tired of family opposition, a couple in Nagpur took poison; the young man died
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा