विशेष प्रतिनिधी
फुरसुंगी :- एका नामांकित कंपनीचे बनावट मीठ आणि बनावट औषध गोळ्यांची विक्री फुरसुंगी गावातून करण्यात येत आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .raids
हडपसर फुरसुंगी रस्त्यावरील गोदाममध्ये पोलीस आणि मुंबईच्या कॉपीराईट पथकाने संयुक्त छापा टाकून एका नामांकित कंपनीच्या मिठाचे बनावट शेकडो पॅकेट्स जप्त केले आहेत.याविरोधात एका व्यावसायिकाविरोधात कॉपीराईट कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नामांकित कंपनीच्या वतीने काम करणारे कृष्णा कनोजिया यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बनावट औषध विक्री
वडगाव येथील एका औषध विक्री करणाऱ्या दुकानातुन बनावट औषध गोळ्यांची विक्री होत असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणला आहे.याबाबत एफडीए निरीक्षक श्रुतिका जाधव यांनी वडगाव येथे गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सात्विक फार्मा शॉपवर कारवाई करण्यात आली असून मालकासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
Raids on fake salt and medicine units in Fursungi
महत्वाच्या बातम्या